पुणे गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतही आपला वेगळा ठसा उमटवला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारी २०१९ मध्ये घेतलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्याभवन शाळेतील १८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

या परीक्षेचा निकाल ‘पात्र-आपत्र’ स्वरूपात अगोदरच घोषित करण्यात आला होता. दि. १९ जून रोजी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. मराठी माध्यमातून स्वाती मांदाडकर, हर्षदा आटपाडकार, गौरी ढाले, चैतन्य पाटील, यशवर्धन जगदाळे, हर्षद पायमोडे, सार्थक जाधव, साजरी राजिवडे, श्रुतिका इंदलकर या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. इंग्रजी माध्यमातून आर्या रोकडे, भूमी गायकवाड, आरती बाभनीया, आदित्य बिराजदार अनिल सिंग, फाल्गुनी पाटील, गौरी प्रभू, रुचिता साळुंखे, सिद्धी गावडे, या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

संचालक दिनेश मिसाळ आणि डॉ. शं . पां. किंजवडेकर, मुख्याध्यापक शिवाजी माळी, सुवर्णा मिसाळ, मनीषा मुळीक, श्रीजा नायर तसेच सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.