दिल्ली येथे सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी ठाणे ते वाशी – बेलापूर मार्गावरील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज मध्य रेल्वे प्रबंधक एस के जैन यांची मुंबई येथील त्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक आयोजित केली.

सर्व प्रथम खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकात धीम्या गतीने सुरू असलेल्या कामांची चौकशी करून या कामाला कधी गती देणार या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने 30 जून रोजी सर्व कामे पूर्ण करून पहिल्या मजल्यावरील चार चाकी वाहने पार्किंग सेवा सुरू करू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना देण्यात आले. त्यानंतर फलाट दोन तीन-चार पाच व सहावर शेड नसल्याने सुरू होणाऱ्या पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच काही ठिकाणी इंडिकेटर्स बंद असतात याची चौकशी केली. त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडून ही सर्व कामे जुलै पर्यंत पूर्ण करून स्थानकात ठाणे रेल्वे स्थानकात डिजिटल इंडिकेटर बसून देण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाकडून खासदार राजन विचारे यांना दिली. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात सरकत्या जीन्यांमध्ये वाढ करून पूर्वेस वातानुकूलित शौचालय तसेच फलाटावर महिलांकरता शौचालयाची निर्मिती करावी अशी प्रामुख्याने मागणी त्यांनी त्या वेळी केली. त्यावर रेल्वे प्रशासनाने हे तांत्रिकदृष्ट्या फिजिकल आहे की नाही याची संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी करू अशीग्वाही दिली.

ठाणे रेल्वे स्थानकात आवश्यक मेडिकल सेवा व प्राथमिक उपचार केंद्र सुरू आहे. याच धर्तीवर ऐरोली ते बेलापूर या मार्गावरही सुरु करावे, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली. यावर रेल्वेने लवकरच या मागणीचा विचार करून आम्ही ही सेवा या रेल्वे स्थानकातही सुरू करू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले.

खासदार राजन विचारे यांनी ठाणे ते वाशी बेलापूर मार्गावरील सर्व स्थानकांमध्ये अपंगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणाऱ्या सोई ई-सुविधा भर द्यावा. यावेळी रेल्वे प्रशासनाने सिडकोने विकसित केलेल्या रेल्वे स्थानकात सरकते जिने किंवा लिफ्ट अशा सुविधा निर्माण करणे झाल्यास सिडको प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन करावे लागणार आहे. अशी मागणी रेल्वे प्रशासनाने खासदार राजन विचारे यांच्याकडे केली. त्या संधर्भात लवकरच बैठकीचे आयोजन करू असा विश्वास खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.

ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळाच्या कामाच्या संदर्भात रेल्वे प्रशासनाला आय आर डी सी चे लोहिया यांच्यासोबत आपण व स्वत मीपुन्हा एकदा चर्चा करून हा प्रश्न निकाली काढू असे रेल्वे प्रशासनालासांगण्यात आले. तसेच कोपरी रेल्वे पुलाचे काम नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून हे काम लवकरात लवकर मार्गी लावावे तसेच कल्याण दिशेस व मुंबईदिशेस असणारे एफ ओ बी हे धोकादायक झाल्याने त्या दोन्ही पादचारी पुलाचीनिर्मिती पुन्हा करून ते रुंद करावेत अशी मागणी खासदार राजन विचारे यांनीपत्राद्वारे केली. त्यावेळी नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, शहर प्रमुख लक्षमण जंगम व  संजय कुमार जैन मंडल रेल प्रबंधक, विद्याधर मालेगावकर अप्पर मंडल रेल प्रबंधक, वरिष्ठ डी सी एम पनवार, एस के गर्ग, व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपसथित होते.

प्रामुख्याने केलेल्या मागण्याप्रामुख्याने केलेल्या मागण्या
* ठाणे वाशी बेलापूर मार्गावरील रेल्वे स्थानकात बॅटरी कार सेवा

* नेरूळ रेल्वे स्थानकात सरकते जिने

* जुईनगर रेल्वे स्थानकाचे नाव जुईनगर- शिरवणे

* जुईनगर रेल्वे स्थानकात सुरक्षेचे मध्ये वाढ

* ठाणे ते वाशी बेलापूर या रेल्वे स्थानकात एसी लोकल

* दिघा येथील ईश्वर नगर ते गणपती पाडा याठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती