लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा गैरफायदा घेवून मुंब्रा प्रभाग समितीतील समशाद नगर येथील शंकर मंदिर रोडवरील शिवसेना शाखेमागे बांधण्यात आलेल्या ४ मजली इमारतीच्या अनधिकृत पाचव्या मजल्याचे आरसीसी कॉलम, स्लॅब व विटांचे बांधकाम १२ एप्रिल रोजी ठाणे महापालिकेच्यावतीने तोडण्यात आले. 


समशाद नगर येथील शंकर मंदिर रोडवरील अनधिकृत बांधकामावर ठाणे महापालिकेच्यावतीने  धडक कारवाई करण्यात आली.  

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत मुंब्रा प्रभाग समितीक्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात येत आहे.

शुक्रवारी म्हणजेच १२ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान मुंब्रा परिसरातील समशाद नगर येथील शंकर मंदिर रोड,शिवसेना शाखेमागे असलेल्या ४ मजली इमारतीच्या अनधिकृत पाचव्या मजल्याचे आरसीसी कॉलम, स्लॅब व विटांचे  बांधकाम गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात आले. सदरची कारवाई उपआयुक्त अशोक बुरपल्ले व मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अमित गडकरी, जितेंद्र साबळे यांच्या साहाय्याने केली असून यापुढेही निवडणूक कामकाज सांभाळून आचरसंहिता दरम्यानही शहरातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले,हातगाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.