मतदार जागर जनमंचासाठी कोलाड येथे 16 एप्रिल 2019 रोजी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सुनिल तटकरे यांनीदेखील आपली उपस्थिती दर्शवली. सभेतील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सुनिल तटकरेंना आपल्या मनातील प्रश्न विचारले. तटकरेंनीही त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत लोकशाहीत जनता उमेदवारांना प्रश्न विचारू शकते हा धडा रूजवण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. या जनमंचाच्या कार्यक्रमानंतर सर्वहारा जन आंदोलनाची सर्व तालुका कमिट्यांची मिटींग घेण्यात आली. या मिटींगमध्ये त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एका बाजूला धर्मांधता, जातीयता पसरवून झुंडशाहीच्या जोरावर खून, मारामाऱ्या, हिंसा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला सर्व लोकशाही यंत्रणा ताब्यात घेऊन सरकारला जाब विचारणाऱ्या नागरिकांचा, पत्रकारांचा आवाज बंद केला जात आहे व त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत आहे, असे सर्वहार जन आंदोलनाचे म्हणणे आहे. 32 रायगड लोकसभा मतदारसंघात सुनिल तटकरे हे भाजप-सेना युतीचा पाडाव करू शकतील, असा विश्वास सर्वहार जन आंदोलनाला असल्याने त्यांनी तटकरेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

[wpdm_package id=’8565′]