गृहिणींच्या छोट्या उद्योगाबाबत योग्य प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भाजपा नगरसेविका प्रतिभा मढवी तसेच ठाणे भाजपा उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या सहकार्याने ‘प्रतिभा महिला बचत गटाच्या’ माध्यमातून पापड विक्री केंद्राचे उद्घाटन सौ. मढवी यांंच्याहस्ते राजेश मढवी यांच्या उपस्थितीत नुकतेच बी केबीन गौतमवाडी येथे पार पाडण्यात आले. यावेळी निता गोसावी, वर्षा महाडीक, सिमा शेलार, जयश्री चिकणे, विद्या गायकवाड, शैला हिरे आदी बचत गटांच्या संचालक महिला उपस्थित होत्या. या महिला बचत गटासाठी समाजसेवक गणेश चिकणे यांनी मोफत गाळा उपलब्ध करून दिला. महिला बचत गटाच्या या पापड विक्री केंद्रावरील घरगुती पद्धतीने तयार विविध प्रकारचे तयार केलेले पापड उपलब्ध असून जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी हे कुरकुरीत व खुमासदार पापड ठाणेकरांच्या नक्कीच पसंतीस उतरतील, असा विश्वास सौ. प्रतिभा मढवी यांनी व्यक्त केला.

Papad sales center Thane