गलिच्छ भिकऱ्यांनी थाटला होता संसारउघड्यावरच नैसर्गिक विधी व लैंगिक चाळे सुरू असल्याने नागरिक झाले होते हतबल

नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसर सिडकोने मोकळा केला आहे. अनेक महिने या परिसरात भिकाऱ्यांनी स्वतःच संसार थाटला होता.

या परिसराला सध्या गलिच्छतेचे रूप आलेले होते. चक्क महिन्याभरापासून अनेक भिकारी आपला संसार घेऊन येथे बिनधास्त राहत होते. सिडकोच्या जागेत आपला हा संसार थाटून बिनधास्तपणे जागेचा वापर केला जात होता. नैसर्गिक विधी उरकले जात असल्याने या भागाचा उकिरडा झाला होता. सिडकोच्या अंतर्गत हा परिसर असला तरी एन एम एम टीचा बस थांबा या परिसरात आहे. या भागात असलेल्या बस थांब्याचा आधार हे भिकारी उन्हापासून वाचण्यासाठी, राहण्यासाठी व दिवसभर बसण्यासाठी करत होते. त्यातच कधीही आंघोळ न करणारे हे भिकारी याच जागेत शिळे पाके अन्न खाऊन राहत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिक देखील या बस थांब्यावर उभे राहणे टाळू लागले होते.तर नेहमी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मात्र या भिकाऱ्यांच्या गलिच्छ व रात्री उघड्यावर केल्या जाणाऱ्या अश्लील चाळ्यांमुळे शरमेने मान खाली घालावी लागत होती. भिकाऱ्यांनी थाटले नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर संसार अशा आशयाचे वृत्त प्रसारित करून अधिकच या संपूर्ण समस्येला चाय विथ न्यूज या वेब पोर्टलने वाचा फोडली होती. त्याची दखल गजेत सिडकोकडून या भिकाऱ्यांवर करवाई करून हा परिसर मोकळा व स्वच्छ करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नवी मुंबईतील नेरुळ विभाग म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या रेल्वे स्थानकात नागरिकांचा वावर तितकाच मोठा आहे. त्यात उलवे ट्रेन सुरू झाल्याने अधिक भर पडलेला आहे. या गजबजलेल्या नेरुळ स्थानकाचा पूर्व भागातील परिसर भिकाऱ्यांनी व्यापलेला होता. संपूर्ण संसारच त्यांनी स्थानकाच्या परिसरात उभारल्याने दिवसभर हे भिकारी येथे ठाण मांडून बसलेले होते. संतती प्रजननावर कोणतीही ताबा नसणाऱ्या या भिकाऱ्यांतील जोडप्यांना तीन ते चार मुले असल्याने दिवसभर पहुडलेले आई वडील या मुलांकडून भीक मागून घेत होते. प्रत्येक नागरिकांच्या पायाला हात लावून भीक मागत असल्यामुळे त्यांच्या गलिच्छ अवताराला पाहून मात्र महिला वर्गाला दररोज त्रास सहन करावा लागत होता. त्यात या मुलांना हटकले तर त्यांचे आई वडील नागरिकांवर धावून येत असल्याने नागरिकांचा नाईलाज होत होता.

त्यात हे आई वडील दिवसभर दारू प्यालेलेले असल्याने राजरोसपणे शिवीगाळ व भांडणे सुरू असायची .
या परिसरात असलेला एनएमएमटीचा बस थांबा या भिकाऱ्यांनी घर म्हणूनच वापरण्यास सुरुवात केली असून दिवसभर भिकारी तिथे पथारी पसरून झोपलेले पाहायला मिळत होते. लहान मुलांचे झोळीचे तयार केलेले पाळणे या बस थांब्याला ठिकठिकाणी बांधून ठवलेले होते.त्यात शिळे अन्न शोधून आणून ते खाऊन झाल्यावर खरकटे उघड्यावर तसेच टाकून दिले जात होते. तर नैसर्गिक विधी देखील या परिसरात केले जात असल्याने परिसराला गलिच्छतेचे स्वरूप आले होते. कायम नशेच्या अंमलात असलेले हे भिकारी उघडपणे लैंगिक चाळे करत असल्याने नोकरीनिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शरमेने मान खाली घालावी लागत होती. तर आंबटशौकीन येथे घुटमळत असायचे.त्यामुळे उलवेसाठी जाणाऱ्या नागरिक हा बस थांबा टाळून नाईलाजाने या परिसारातून सुटका करून घेण्यासाठी रिक्षाचा आधार घेऊ लागले होते. महिला वर्गात भिकाऱ्यांमुळे भीतीचे वातावरण पसरलेले होते. अनेक मुली तर आपल्या पालकांना स्थानकातून नेण्यासाठी बोलावू लागल्या होत्या.

#रोगराई पसरण्याची शक्यता

पावसाळा जवळ येत आहे.
त्यात हे भिकारी उघड्यावरच नैसर्गिक विधी करत असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता होती. पालिका स्वच्छतेसाठी प्रयत्न करत असताना मात्र सिडकोकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होऊ लागले होते.त्यात हा परिसर सिडकोकडे असूनही त्यांच्या सुरक्षारक्षकांचे झालेले दुर्लक्ष या गलिच्छतेला कारणीभूत असल्याची टीका येणारे जाणारे नागरिक करू लागले होते. या भिकाऱ्यांचा किळसवाणा अवतार पाहून पोलीस देखील त्यांना हात लावण्यास धजावत होते.

# चाय विथ न्यूजतर्फे या समस्येची दखल घेऊन वाचा फोडल्याबाबद्दल धन्यवाद.
अनेकदा तक्रार करूनही काहीही उपायोग्य झाला नव्हता.सुरक्षा रक्षक असूनही हा प्रकार सुरू होता. त्यामुळे अनेकदा आम्हाला येता जाता भीती वाटायची. नवी मुंबई शहर हे २१ व्या शतकातील मानले जाते. या स्वच्छ शहरात असे ओंगळवाणे रूप म्हणजे शहराची रया गेल्याचे भासत होते. ही समस्या सोडवल्याबद्दल चाय विथ न्यूजचे आभार.
(रेश्मा आमकर नागरिक नेरुळ)