नुकताच “इंडिया रेटींग अँड रिसर्च” या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेस “डबल ए प्लस स्टेबल (AA+ Stable)” हे पत मानांकन  मिळाल्याबद्दल  खासदार राजन विचारे यांनी  आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  रामास्वामी यांची भेट घेऊन   त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्यावेळी नवी मुंबई शहराच्या विकासकामांच्या संदर्भात चर्चा केली  त्यावेळी याप्रसंगी मिळाल्याबद्दल जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक एम. के. मढवा आकाश मढवी, राजु कांबळे, ज्ञानेश्वर सुतार, लता काटे, रतन मांडवे आदी उपस्थित होते.

नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडीला पूर्णविराम देण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन महाकाय उड्डाणपुलांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या पुलांच्या निर्मिती करिता आवश्यक असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या किचकट परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. हे तिन्ही पूल ऐरोली, वाशी आणि बेलापूर परिसरात उभे राहणार असून त्यांच्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण निम्म्याने कमी होणार आहे.

घणसोली आणि ऐरोलीच्या दरम्यान सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले आहे. हा पूल उभा राहिला तर मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ठाणे-बेलापूर मार्गाचा वापर करावा लागणार नाही. ऐरोली येथे संध्याकाळी होत असलेली जिवघेणी वाहतूक कोंडी होणार नाही. बहुसंख्य वाहने  घणसोली आणि ऐरोलीमध्ये प्रवेश न करताच ऐरोली खाडीपूल मार्गे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. वाशी येथे पामबिच मार्गावर ऑरेंजा कॉर्नर ते कोपरी गाव सर्व उड्डाणपूल तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. संध्याकाळी या भागात मोठी वाहतूक कोंडी होते. हा उड्डाणपूल निर्माण झाला तर वाशी मार्केटमधून येणाऱ्या वाहनांनी ताटकळत सिग्नलला थांबावे लागणार नाही. तसेच जुईनगर येथील रेल्वे क्रोसिंगवर नवीन उड्डाणपूल व ऐरोली मुलुंड रस्त्यावरील गरम मसाला हॉटेल समोर पादचाऱ्यासाठी अंडरपास बनविण्याबाबत चर्चा झाली. व हे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी निवेदन दिले.   

बेलापूरमध्ये कोकणभवन समोर मोठी वाहतूक कोंडी होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर येथील प्रवास फार डोकेदुखीचा होणार आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने बेलापूर येथील सेक्टर ११ ते सेक्टर १५ दरम्यान रस्ता आणि उड्डाणपूल तयार करण्यासाठी हलचाली सुरू केल्या आहेत. किल्ले गावठाण चौकापासून हा रस्ता थेट सायन-पनवेल महामार्गाला मिळणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, उरण, उलवे आदी ठिकाणी जाणाऱ्या या वाहनांना बेलापूरमध्ये शिरण्याची गरज पडणार नाही. हे सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत, अशी मागणी  खासदार राजन विचारे यांनी आज पालिका आयुक्त रामास्वामी एन यांच्याकडे केली.

महापालिकेने हाती घेतलेल्या उड्डाणपुलांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या राज्य आणि केंद्र यासरकारच्या सर्व किचकट परवानग्या मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांंपासून रेल्वेची परवानगी न मिळाल्यामुळे रखडलेले चार पादचारी पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्याच धरतीवर या पुलांची कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाला सर्व सहकार्य करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली.