उन्हाळा सुरु झाला की शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते, मुंबईला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असतानाच बाजूलाच असलेल्या नवी मुंबईत मात्र पुरेसा पाणीसाठा असल्याने नवी मुंबईकरांना पाण्याची चिंता करण्याचे कारण नाही, असे नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यूज विथ चायशी बोलतांना सांगितले केले.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा असूनही नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सुमारे ७६.६६% इतके पाणी धरणात असून येत्या १५ सप्टेंबर पर्यंत वापरता येईल इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पण असे असले तरीही पाणी सांभाळून वापराच्या सूचना देखील त्यांनी केल्या.