घाना,वेस्टअफ्रीकेत सलग ५ व्या वर्षी  १ मे रोजीमहाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.मुख्य म्हणजे नवी मुंबईतून घाना देशात स्थायिक झालेल्या नागरिकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र मंडळातर्फे  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळीखास पाहुणे म्हणून उच्च आयुक्त भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त वीरेंद्रसिंग यादव,इंडियन असोशिएशन घानाचे अध्यक्ष  राजेश ठक्कर तसेच इतर भारतीय प्रादेशिक संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमास ६०० पेक्षा जास्त   भारतीय नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्र गौरव समूह गान, भारतीय सैन्यावर प्रेरित होऊन लहान मुलांनी कार्यक्रम सादर केला. इतरही सांस्कृतिक आणि करमणुकीचे बहारदार कार्यक्रम मंडळाच्या सभासदांनी सादर करण्यात आले.नोकरी आणि धंद्या निमित्त आपल्या जन्मभूमीपासून कित्येक किलोमीटर लांब कर्मभूमीत स्थायिक झालेल्या येथील ३०० च्या आसपास असलेल्या मराठी बांधवांतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात.  परदेशातही  संस्कृती जपण्यासाठीमंडळातर्फे महाराष्ट्र दिनासोबत मकरसंक्रात, होळी,  व गणेशोत्सवासारखे सण साजरे करुन महाराष्ट्रीन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या प्रयत्न केला जातो.पुढील पिढीलादेखील संस्कृतीची ओळख आणि  येथील वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांचे आपसातले ऋणानुबंध वाढवण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे हे मंडळाचे उद्दिष्ट्य ठेवून हे कार्यक्रम साजरे केले जातात.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अरुण पाटिल, सचिव ,सह सचिव अनुक्रमे अभिनीत अधिकारी, आतिश श्रृंगारपवार,व्यवस्थापक सचिन,खजिनदार गणेश फडाळे यांनी प्रयत्न केले.