नव्या वर्षाची चाहूल लागली की आपल्याला वेध लागतात ते नवं वर्ष संकल्प करण्याचे! अनेक सेलेब्रिटी सुद्धा हे नवं वर्षाचे संकल्प करतात, चला तर मग आपण आपल्या लाडक्या मराठी कलाकारांचे पुढील वर्षाचे संकल्प जाणून घेऊयात

 

अनेक वर्षांपासून काही तरी संकल्प करतेय पण ते पूर्ण होता होता राहतात, ‘फिटनेस’ हा  बऱ्याच कलाकारांचा संकल्प असतो, फिट राहून काम करावी मग ते काम अजून चांगल्या पद्धतीने पूर्ण होतात पण जॉब आणि बाकी कामामूळे माझा व्यायाम करण्याचा संकल्प काही केल्या पूर्ण होत नव्हता पण यावर्षी नवी मालिका मिळाली आणि त्यात माझा रोल हा बॉक्सर चा असल्या कारणाने मला आता नेहमीच फिट राहण्यासाठी व्यायाम करावा लागतो त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा हा संकल्प पूर्ण झाला. यंदाच्या नव्या वर्षाचा संकल्प असा आहे की मला ‘गझल’ शिकायची आहे, गझल आवडते त्यामुळे ती शिकायची आहे, बाकी कामामुळे गाणं शिकणं सुद्धा राहिलंय त्यामुळे यावर्षी गझल शिकण्याचा मोठा संकल्प मी केला आहे!

– गौतमी देशपांडे ( सारे तुझाच साठी )


नव्या वर्षाची उत्सुकता तर आहेच पण मी दरवर्षी एकच संकल्प पूर्ण करते तो म्हणजे एक चांगली व्यक्ती आणि बेस्ट अभिनेत्री होण्याचा, याच सोबतीने कामातून वेळ काढून अनेक नियम काटेकोर पणे पाळले जावेत, मस्त फोकस करून काम करावं यांच्या सोबतीने नव्या वर्षात हे संकल्प पार पाडण्याचा नेहमीच प्रयत्न करणार आहे.
– हृता दुर्गुळे ( फुलपाखरू )

येणारा प्रत्येक दिवस हा वेगळी अनुभूती घेऊन जगावा, रोज कामावर फोकस करून ती उत्तम रित्या कशी पूर्ण होतील याकडे लक्ष द्याव यापेक्षा कोणतही मोठं संकल्प नाही, मी नवं वर्ष संकल्प करत नाही कारण ती कामामुळे कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे येणार वर्ष हे वेगळी काम करून पूर्ण करावं आणि कामावर प्रेम करून आयुष्यामधली ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
-पुष्कर जोग .

माझासाठी येणारा प्रत्येक दिवस आणि वर्ष हे नेहमीच ऊर्जा देणारा आणि शुभ असतं, खरंतर मी असे मानवनिर्मित दिवस मनात नाही पण खरंच असे दिवस फॉलो करून आपले संकल्प काही पूर्ण होत नाही. येणाऱ्या प्रत्येक दिवशी कामाचा उत्साह  सळसळता असायला हवा, संकल्प हे अश्या रीतीने पूर्ण कारावेत अस मला वाटत.
– योगेश सोहोनी

कलाकार म्हणून चांगल काम करून प्रेक्षकांसमोर चांगल्या गोष्टी सादर करणं हा माझा उद्देश होता आणि नेहमीच राहील. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांशी माझं जवळचं नातं निर्माण झालं आणि वर्षानुवर्षे दृढ होत गेलं. प्रेक्षकांच्या प्रेमामुळं जी शक्ती मिळाली त्याच्या जोरावर नवीन वर्षात आणखी जोमाने काम करणार आणि वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येईन.
-श्रेया बुगडे (चला हवा येऊ द्या)

नवीन वर्षात काम करत राहण्याचा माझा संकल्प आहे. राणाच्या व्यक्तिरेखेने खूप काही शिकवलं नवीन वर्षात देखील खूप काही शिकायचं आहे. अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या आणि एक सदस्य म्हणून माझ्या कुटुंबातील सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
– हार्दिक जोशी (तुझ्यात जीव रंगला)

नवं वर्षाचा संकल्प हाच आहे की थोडंफार फिट राहावं, जिम ला जावं एका रोल साठी बारीक व्हायचंय म्हणून थोडे फार कष्ट घ्यावे लागणार आहेत, यांच्या सोबतीने पुस्तक वाचनाची सवय स्वतःला लावून घेणार आहे, मोकळ्या वेळात पुस्तक वाचन करायला हवंय हेच नवं वर्षाचे संकल्प आहेत.
– मनमीत पेम