ठाणे जिल्हा आणि खेडेगावातील अंदाजित २०००हून अधिक नागरिक या आरोग्य शिबाराचा लाभ घेणार..

मधुमेह आजाराला नजरेआड केल्याने त्याचा थेट परिणाम नेत्र विकार आणि किडनीवर होतो याबाबत अधिकाधिक जनजागृत सर्वसामान्य नागरीकांत व्हावी यासाठी डाँ.निशांत कुमार, सल्लागार नेत्रविकार तज्ञ, आयबेटिस फाऊंडेशन व श्री.राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी कार्यालयल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक मोठ्या स्वरूपात ठाणे जिल्हातील ग्रामीण व अदिवासी बांधवासांठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात या आरोग्य शिबीराचे आयोजन १५ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात २०००हून अधिक मधुमेही तसेच सर्वसामान्य नागरीक आपली नेत्र तसेच किडनीविकाराबाबत तपासणी करून घेतील. मधुमेहामुळे डोळे तसेच किडनीवरील परिणाम वेळीच ओळखून त्यावर उपचार करता येऊ शकेल.

२०१६ मध्ये १०००हून अधिक नागरीकांची मधुमेह तपासणी करण्यात आली होती. तपासणी केलेल्यांत ८०टक्के मधुमेह असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी त्यांना पहिल्यांदाच त्यांची नेत्र तपासणी करून मधुमेहाचा परिणाम दृष्टीवर कसा परिणाम होते हे तपासले. ६० टक्केहून अधिक नागरीकांत मधुमेहामुळे डोळ्यांत बदल झाल्याचे दिसून आले.

डाँ.निशांत कुमार, सल्लागार नेत्रविकार तज्ञ आणि अध्यक्ष, आयबेटिस फाऊंडेशन, म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत ग्रामीण भागातील तसेच आदिवासी पाडयातील नागरीकांपर्यत पोहचून ज्या रूग्णांना मधुमेह आहे अशांना या आरोग्य शिबीराबाबत माहिती देण्यासाठी १००० स्वंयसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी काम फिरत आहेत. तसेच हे स्वंयसेवक मधुमेहामुळे डोळ्यांवर कसा परिणाम होऊ शकतो आणि परिणामी रूग्ण दृष्टीहिन होऊ शकतो याबाबत पत्रकेही वाटत आहेत.

१५ जून रोजी मधुमेही रूग्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील टाऊन हाँलमध्ये एकत्र येतील व या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घेतील. या शिबीरात रूग्णांना आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, आयबेटिस फाऊंडेशन यांच्यावतीने ८० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

या आरोग्य शिबीरात तज्ञ डाँक्टर, नर्सेस, आँप्टेशियन्स तसेच पँरा मेडीकल स्टाफ यांच्यामार्फत रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे, नजरेचा दोष, डोळ्यांची तपासणी, नेफ्रोपथी (किडनीविकार) आदी तपासणी करण्यात येईल