*विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
*चिक्कीचा दर्जा तपासण्याची गरज.
*शिक्षणाधिकारी झालेल्या प्रकाराबाबत अनभिज्ञ.

नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे गावातील येथील शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चिक्कीत चक्क अळ्या सापडल्या आहेत. या प्रकाराने संपूर्ण शाळेत खळबळ माजली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे चिक्कीचा दर्जा काटेकोरपणे तपासला जात नसल्याचे यानिमित्याने उघड झाले आहे.

तुर्भे गाव शाळा क्रमांक २० मध्ये शाळेत नेहमी वाटली जाणारी चिक्की वाटली जात होती. मात्र या चिक्कीत अळ्या आढळल्याचे निष्पन्न झाले. मात्र या निमित्ताने चिक्कीच्या गुणवत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. चिक्की द्यायला सुरुवात झाल्यापासून महानगरपालिकेतील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पालिका या चिक्की पूरवठादाराला दंड ठोठावते हे पाहावे लागणार आहे.शासनाच्या नियमानुसार कंत्राटदार, शाळेत चिक्की वाटप करणारे कंत्रातदाराचे कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मुलांना खिचडी किंवा चिक्कीसारखे खाऊ देताना स्वतः खाऊन पाहणे आवश्यक आहे. नवी मुंबई महापालिकेत पालिकेत शिक्षक स्वतः ही चिक्की खाऊन बघतात. मात्र या घटनेने शिक्षकांच्या तापसणीवर संशय निर्माण होऊ लागला आहे. पालिका शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या चिक्कीचा दर्जा व चव योग्य नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडे केल्याचे आढळून आले आहे. मात्र असे असतानाही त्याबाबत पालिका प्रशासनाला जाग आल्याचे दिसत नाही. त्यामुळे तुर्भे गावातील शाळेत चिक्कीत आढळलेल्या अळ्या या हे कंत्राटदाराकडून दिली जाणारी चिक्की ही दर्जाहीन असल्याचे सिद्ध झाले आहे.

चिक्की तयार होणारे गोडाऊन गलिच्छ?

ही चिक्की किती शहरीराला पोषक आहे ते कसे ठरवले किती कॅलरीज व प्रोटिन्स यातून मिळतात असा आरोप शिवसेनेच्या सदस्यांकडून स्थायी समितीत विचारणा केली होती. रोज रोज चिक्की खाऊन मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आरोग्य बिघडू शकते. चिक्कीने किती सकस आहार मिळतो असे प्रश्न प्रशासनाला विचारून रबाळेतील एका घाणेरड्या गोडाऊनमध्ये चिक्की तयार केली जाते. त्यावर लोणावळ्याचे लेबल लावले जाते. असा आरोप शिवसेनेच्या सदस्यांकडून करण्यात आला होता. तर या चिक्कीचा दर्जा आजपर्यंत पालिकेने तपासला आहे का अशी विचारणा करण्यात आली होती.

याबाबाबत माझ्यापर्यंत माहिती आलेली नाही. याबाबत तातडीने माहिती घेऊन कळवतो अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले.

– इयत्ता तिसरीत असलेल्या मुलीच्या चिक्कीत या अळ्या या आढळल्या. तिच्या पालकांनी तातडीने ही बाब माझ्या निदर्शनास आणून दिली. पालिका विद्यार्थ्यांना चिक्की देते. मात्र त्याचा दर्जा तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे? सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापकांची आहे. गरीब मुले असतील म्हणून त्यांना कसेही अन्न मिळत असेल तर हे चूक आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी महिन्यातून किंवा दोन महिन्यातून शाळांना भेटी देऊन स्वतः तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र या घटनेवरून शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबतीत गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे.
(शुभांगी पाटील नगरसेविकामाजी स्थायी समिती सभापती)

अनेक मुले दिलेली चिक्की शाळेतच खातात. काही मुले ती चिक्की घरी आणून खातात. त्यामुळे कित्येक लहान मुलांना चिक्की खाताना कळतही नसते की चिक्की योग्य आहे की अयोग्य. त्यामुळे इयत्ता तिसरीच्या ज्या मुलीच्या चिक्कीत अळया आढळून आल्या. तिच्या सोबतच्या कित्येक विद्यार्थ्यांच्या चिक्कीचा दर्जा अयोग्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मुले आजारी पडल्यास त्याची जबाबदारी पालिका घेणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे.