जुईनगर, ता. 1 (बातमीदार) : सानपाडा व तुर्भे परिसराला जोडणाऱ्या सानपाडा रेल्वे स्टेशन खालून गेलेल्या भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालवताना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. भुयारी मार्गातील निखळलेल्या फरश्या त्यामुळे पडलेले खड्डे येथील प्रवाशांची डोके दुखी ठरली आहे. येथे होणारी वाहतूक कोंडी वाहन चालकांना नित्याचे झाली आहे. कित्येक वेळा येथे छोटे-मोठे अपघात देखील झाले आहेत. हा भुयारी मार्ग सोयी ऐवजी गैरसोयीचा झाल्यामुळे येथील नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. 

तुर्भे परिसर, एपीएमसी बाजारपेठ, सायन-पनवेल महामार्गावरून मुंबई व ठाण्याकडे जाणारे लोक त्यामुळे हा मार्ग परिसरातील नागरिकांच्या दृष्टीकोनातून फारच महत्वाचा मानला जात आहे. तर येथून दररोज हजारोच्या संख्येने प्रवाशी ये-जा करत आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती केली जावी अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत. 

नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सिडको प्रशासनाला याबाबत पत्र व्यवहार केला आहे. तर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी सिडकोच्या नवी मंुबई क्षेत्राचे मुख्य अभियंता सुरेश वरखेडकर यांची भेट घेऊन त्यांना या भूयारी मार्गाच्या तात्काळ दुरुस्ती करण्यासंबंधीचे मागणी पत्रक दिले आहे. सिडको भवन येथील  मुख्य अभियंता-विषेश प्रकल्प सिडकोचे सुनिल दराडे यांच्या समवेत पी.डब्लू. बारापात्रे (अधिक्षक अभियंता-प्रकल्प नियोजन व दर्जा) या अभियंता विभागातील अधिका-यांसह बैठक घेऊन याबाबत चर्चा देखील केली आहे. 


Article Contributed By Manoj Ramchandra Datkhile: A graduate in economics and a journalist. He’s presently working as a reporter for ‘Sakal’, one of the leading Marathi daily Newspapers of India. When he’s not busy with writing and reporting, he enjoys teaching English! You can reach him on his mobile: 0.99674.69426 or email to manojdatkhile@rediffmail.com

Disclaimer: “The opinions expressed in this article are those of the author, and they do not reflect in any way those of the institutions to which he is affiliated, or the publication, or any of the members of the publication or its parent organization. newswithchai.com is not responsible for the accuracy, completeness, suitability, or validity of any information on this article. All information is provided on an as-is basis. The information, facts or opinions appearing in the article do not reflect the views of newswithchai.com and newswithchai.com does not assume any responsibility or liability for the same.”

Image Credits: “Except where noted, the images in this article remain the exclusive property of newswithchai.com and unauthorized use of these images is expressly prohibited. If you wish to use an image from this editorial, please contact me via info@newswithchai.com for permission.