स्वराज्याचे धाकले धनी व दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज १४ मे, २०१९ रोजी जयंती नवी मुंबईतील एकमेव किल्ला किल्ले बेलापूर या ठिकाणी सकाळी ७ वाजता युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्वप्रथम किल्ले परिसराची साफसफाई करून पूजेस सुरुवात करण्यात आली. सदर शंभुजयंती उत्सव हा गडावर घेण्याचा मूळ उद्देश म्हणजे लोकांना किल्ला माहित होणे, हा होता. यावेळी उपस्थित सर्व युवकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा किल्ल्याच्या सुशोभीकरण बाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

सदर कार्यक्रम पार पाडण्यास अध्यक्ष शंकर वसमाने, सरचिटणीस सौरभ आहेर, उपसचिव आकाश वसमाने, सुदर्शन कौदरे, विशाल लोकरे, शंकर संगपाल, सूरज निकम, निसर्ग वाघमारे, श्याम वाघमारे इ. पदाधिकारी व सदस्यांनी अधिक मेहनत घेतली. त्याचसोबत अ.भा.वि.प. चे अमित धोमसे व अजित धायगुडे हे देखील उपस्थित होते.                    

यादरम्यान जयंती निमित्त खारघर शहरातील शंभूराजे मित्र मंडळ देखील किल्ल्यावर ज्योत प्रज्वलन करिता दाखल झाले. यानिमित्त ज्योत प्रज्वलन करून देण्यात एक वेगळाच आनंद मिळाला. त्याचसोबत त्यांना संपूर्ण किल्ल्याची देखील माहिती देण्यात आली. यावेळी शंभूराजे मित्र मंडळाच्या वतीने रोहन कदम, राज कदम, अखिलेश पवार, बाळासाहेब आव्हाड, अमोल शिंदे, हेमंतराजे धायगुडे आदी उपस्थित होते.