निकालाची धाकधूक

लोकसभा निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यात इगझिट पोलमुळे युतीत आनंदाचे वतावरण असले तरीही आघाडीने आपल्या आशा सोडलेल्या नाहीत. ठाणे व कल्याण लोकसभा मतदार संघात एकतर्फी लढत होणार असल्याचे बोलले जात असले तरीही आघाडीने आपल्या आशा सोडलेल्या नाहीत. मात्र निकालाचा दिवस असल्याने सर्व उमेदवारांकडून देव पाण्यात ठेवले गेले आहेत. त्यामुळे निकालाची धाकधुकता व उत्कंठता शिगेला पोहोचली आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघात एकूण २० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मात्र मुख्य लढत युतीचे विद्यमान खासदार राजन विचारे व आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी भाजपसोबत युती झाल्याने सेनेचे पारडे जड मानले जात आहे. मागील निवडणुकीत मिळालेली आघाडी यंदा कमी होणार असल्याचे सोशल मीडियावर मान्य केले जात असल्याने खुद्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विचारे यांच्या नावावावर शिक्केमोर्तब झालेले आहे. मात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने काही महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेचे आराखडे बांधले जाणार आहेत. ठाणे महापालिकेत सेनेचे तर मीरा भाईंदर महापालिकेत भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे विचारेंना या दोन्ही भागांतून हमखास लीड मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तर सेना हा प्रमुख विरोधी पक्ष आहे.मात्र तरीही मुख्यमंत्र्यांनी या शहराला जास्तच मनावर घेतलेले असल्याने भाजपा देखील या दोन प्रमुख पक्षांच्या तोडीस तोड बनलेला आहे. विविध समाजांचे वर्चस्व व अनेकवर्षं खोळंबलेले प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या चाली खेळलेल्या आहेत. येत्या निवडणुकीआधी हे प्रश्न सोडवून नवी मुंबई आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न भाजपाचा असणार आहे.मात्र सध्या तरी सर्व काही केंद्रातील सरकारवर अवलंबून असणार आहे. भाजपच्या वाढीचा फायदा एकप्रकारे विचारेंना होणार आहे. तसा दावा सेना व भाजपकडून केला जात आहे. बेलापूर मतदार संघातून भरघोस लीड मिळवून देऊन विचारेंना निवडणून आणण्याचा व मोदी सरकार बळकट करण्याचा विडा भाजपने उचलेला आहे. त्यात विद्यमान खासदार यांनी आपल्या कामांच्या जोरावर नवी मुंबईत मते मागितली आहेत. आपल्या कामाचा आलेख विचारे यांनी घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात एक्झीट पोलमुळे युतीचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. मात्र असावं असले तरी आघाडीने मात्र आशा सोडलेल्या दिसून येत नाहीत. मुळात राजन विचारेंच्या विरोधात लढण्यास नकार देऊन माजी मंत्री गणेश नाईक यांनी एकप्रकारे वाऱ्याची दिशा ओळखल्याचे बोलले जाते. खुद्द गणेश नाईकांनी नकार दिल्यावर माजी खासदार संजीव नाईक यांनी उभे राहणे म्हणजे विचारेंचा विजय सोपा होण्यासारखे होते. त्यामुळे स्वतः लोकसभा निवडणुक लढवून पराभव पत्करून येत्या काळात होणाऱ्या विधानसभेआधी विरोधकांना आयती संधी न देण्याच्या हेतून ही निवडणूक नाईकांकडून टाळली गेल्याचे जाणकार मत व्यक्त करत आहेत. त्यात आनंद परांजपे यांनी वडिलांच्या पुण्याईवर मते मागितली असली तरी सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांनी प्रचार केला आहे. मात्र सुशिक्षित उमेदवारापेक्षा विकासकामांवर जनता भर दवत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.त्यामुळे सध्या विचारे यांचे पारडे जड वाटत असले तरी सर्वच उमेदवार एवव पाण्यात ठेवून आहेत.