विधानसभेला आगरी कोळी जनता निवडून आणू शकत नाही तरी पाडू शकतो

खऱ्या अर्थाने भूमीपुत्रांच्या अस्तित्वाचा लढा सुरू झाला असून त्यानिमित्ताने ग्रामसभा घेत आहोत. या ग्रामसभांना उदंड प्रतिसाद मिळत असून नवी मुंबईतील नेत्यांच्या पायाखालची जमीन सारकलेली आहे.घरांच्या जमिनीचे नियमितीकरण, घरांच्या बांधकामाचे नियमितीकरण व संरक्षण तसेच नवीन बांधकामांसाठी वाढीव एफएसआय सह पुनर्विकासाचा पर्याय असे अनेक मुद्दे समोर आहेत. यावर उपाय म्हणून मूळ व विस्तारित गावठाणांचे सर्वेक्षण करणे त्यांना सनद म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणे असे हे मुद्दे अम्ही वडणुकीआधी सोडवण्याचे नवी मुंबईतील पक्षांना सांगितले होते मात्र त्यांनी हे मुद्दे न सोडवल्याने  निवडणूकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा आगरी कोळी फाउंडेशनतर्फे करण्यात आली. कोपरखैरणे येथे दि.१५ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या फाउंडेशनच्या बैठकीत अध्यक्ष निलेश पाटील हे बोलत होते. या घोषणेमुळे आता राष्ट्रवादी व भाजप तसेच सेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

आम्ही गेल्या ३ महिन्यांपासून गावठणात जनजागृती सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. सध्याचा लढा हा शेवटच्या टप्प्यात आला असून ग्रामस्थांनी साथ द्यावी असे आवाहन यावेळी निलेश पाटील यांनी केले. ते म्हणाले की सर्वे होणे गरजेचे आहे. ते झाले की प्रत्येकास प्रॉपर्टी कार्ड मिळू शकेल. त्यामुळे ५२ क चा अर्ज करता येऊन त्याद्वारे बांधकाम करता येईल. मात्र इंग्रजांच्या काळात १९३० साली झालेले सर्ववेक्षण ग्राह्य धरले जात आहे. मात्र त्यांनंतर नैसर्गिक व गरजेपोटी झालेले बांधकाम याबाबत कधी सर्वे होणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचाला. नवी मुंबईतील सर्वपक्षीय नेते, आमदार व नगरसेवक हे ५२ क बाबत कोणत्याही अभ्यास नसल्याने नवी मुंबईचे हे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आतापर्यंत ९ ग्रामसभा झालेल्या असून जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.मात्र राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करत आहेत. नवी मुंबईतील नेते आमदार स्वतःच्या हितासाठी सिडकोला वाकवू शकतात मात्र ते भूमीपुत्रांसाठी सिडकोला वाकवू शकत नाही अशी टीका त्यांनी केली. या निवडणुकीत बहिष्काराचे शस्त्र उगारून सदैव गृहीत धरत असलेल्या या नेत्यांना समाजाची ताजड दाखवून द्यायची आहे. लोकसभेला नाही मात्र विधानसभेला मात्र या नेत्यांना विचार करावाच लागेल असा निर्णायक इशारा त्यांनी दिला. मात्र जर ग्रामस्थांनी फाउंडेशनला साथ दिली नाही तर मात्र ही चळवळच बंद करण्याचा इशारा त्यांनी बोलून दाखवला.

आ.मंदा म्हात्रे यांना खुले आव्हान
आ.म्हात्रे यांनी बेलापूर येथे झालेल्या सर्वेबाबतची संपूर्ण कागदपत्रे खुली करावीत. आमचा स्पष्ट आरोप आहे की हा सर्वे  क्लस्टरसाठीच होता. त्यामुळे याबाबत समाजाची साशंकता दूर करावी. असे खुले आव्हान त्यांनी आ. मंदा म्हात्रे यांना दिले.

जो प्रश्न सोडवेल त्याचा उघड प्रचार करू व मतदान करू
समजाचे प्रश्न जो पक्ष सोडावेल त्याचा उघड प्रचार आम्ही करू. त्यामुळे बहिष्कार घालून समाजाची ताकद दाखवून द्यायची आहे. अभी नही  तो कभी नही यावेळेस जर आहव ग्रामस्थांनी कचखाऊ धोरण अवलंबले तर मात्र हा प्रश्नच सुटणार नाही असेही ते म्हणाले.

विधानसभा उमेदवारीच्या प्रश्नाला दिली बगल
लोकसभेला बहिष्कार टाकून विधानसभेला समाजाची ताकद दाखवण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे. यावर फाउंडेशन स्वतःचा उमेदवार उभा करणार  का असा प्रश्न विचारला असता निलेश पाटील यांनी या प्रश्नाला बगल दिली.