1985 साली नेरूळ, नवी मुंबई येथे सुरु झालेल्या सेंट झेविअर्स शिक्षण संस्थेच्या सेंट झेविअर्स शाळेच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी सेमी-इंग्रजी व इंग्रजी माध्यमाचा सलग 20 वर्षे 100% निकाल अबाधित ठेऊन शाळेने यशाची उंच भरारी घेतली आहे. हि यशाची शिखरे पाद्क्रंत करत असताना क्रिडा दिवस , सांस्कृतिक कार्यक्रम , वार्षिक स्नेह संमेलन तसेच इतर सण उत्सव देखील शाळेत मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. त्यातून गोळाफेक, बॉक्सिंग अशा खेळात राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेले विद्यार्थी शाळेने घडविले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात शाळेने सुरु केलेल्या विज्ञान शाखेला दहा वर्षे झाली असून सातत्याने 100 टक्के निकाल टिकवून ठेवला आहे. शिवाय नेरूळ , नवी मुंबई परिसरात विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी अती उत्तम विद्यालय असल्याचे पालकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे सर्वतोपरी या ठिकाणी प्रवेशासाठी पालक व विद्यार्थी आग्रही असतात.  

नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) चालवणारी एकमेव शाळा असल्याचे सांगण्यात येत आहे. देशाच्या राजधानी दिल्ली येथे 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी होत असलेले संचलन देखील येथील विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यामुळे या चालत असलेल्या प्रशिक्षणात येथील शिक्षक व विद्यार्थ्यांची अथक मेहनत दिसून येते. शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही विशेष म्हणजेच अपंग, अंध, मतिमंद त्यात डायलेक्सिया, डीसग्राफिया असे इतर प्रकाराच्या आजारात येणारी मुले या शाळेत शिक्षण घेत असतात. आवश्यक त्या मुलांना शाळेतून रायटर पुरवणे तसेच सर्वतोपरी मदत करण्याची तयारी येथील प्राचार्य आणि शिक्षक यांची असते. अशा प्रकारची सरासरी तीस ते पस्तीस मुले संपूर्ण शाळेतून इयत्ता दहावीच्या परीक्षेत पास होतात. या पद्धतीच्या मुलांचा आलेख चढता ठेवण्यासाठी येथील शिक्षक विशेष असे प्रशिक्षण घेऊन या मुलांवर मेहनत घेत असतात. शिवाय आज हि मुले सीए आणि शॉर्ट फिल्म अशा क्षेत्रात आपला नोकरी व्यवसाय यशस्वीरीत्या करत आहेत. 

Mrs. Manisha M. Andhansare
Mrs. Manisha M. Andhansare

इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत दरवर्षी मुलांना संगणकीय पद्धतीने फेरफार करून वर्ग बदलण्यात येतात. त्यामुळे मुलांमध्ये ग्रुपिंग करून मैत्री करणे असे प्रकार होत नाहीत. एखादा विद्यार्थी सातत्यने वाईट संगतीत राहत नाही. बदल्यात मित्रांसोबत जुळवून घेणे हा स्वभाव वाढीस लागतो. प्रेमळ व मेहनती शिक्षक त्यांचे विद्यार्थ्याकडे असणारे व्ययक्तिक लक्ष आणि सातत्याने होणाऱ्या परीक्षा यामुळे विद्यार्थी कार्यक्षम राहतो व त्याची प्रगती उंचावण्यास फायदा होतो. शाळेच्या मुलांचे मूल्यमापन करण्यासाठी इतर संस्थांकडून प्रश्नपत्रिका काढून घेणे, हुशार मुले वेगळी करणे, 60 टक्क्याच्या खालील विद्यार्थी वेगळे करणे, या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून सराव करून घेणे या पद्धतीचा अवलंब करून निकाल वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. या सततच्या  नियोजनाने शाळेतील सारे विद्यार्थी प्रथम श्रेणी ग्रहण करत असतात. 

भविष्यात तर कमीत कमी 70 टक्के गुणांच्या खाली विद्यार्थी नसावा असा संकल्प शाळेच्या प्राचार्या मनीषा अंधानसरे यांनी केला आहे. निकाल आणि इतर शाळेच्या यशामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व संबंधित व्यक्तींचा मोठा वाट असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शाळेच्या स्थापनेपासून सेवेत असलेल्या अंधानसरे यांनी बीएस्सी एमएड , एलएलबी, पर्सनल व्यवस्थापन यात पदविका प्राप्त केली आहे. त्यामुळे व्यवस्थापनात नैपुण्य असलेल्या प्रत्येक समस्येला धडाडीने सामोरे जाऊन प्रश्न मार्गी लावणाऱ्या आणि या वयात देखील खूपच कष्टाळू व कार्यक्षम असलेल्या या प्राचार्या शाळेचे भूषण असल्याचे म्हटले जाते. 

Featured Photo Credits: www.dnaindia.com/mumbai/

MANOJ DATKHILEArticle Contributed By Manoj Ramchandra Datkhile: A graduate in economics and a journalist. He’s presently working as a reporter for ‘Sakal’, one of the leading Marathi daily Newspapers of India. When he’s not busy with writing and reporting, he enjoys teaching English! You can reach him on his mobile: 0.99674.69426 or email to manojdatkhile@rediffmail.com

Disclaimer: “The opinions expressed in this article are those of the author, and they do not reflect in any way those of the institutions to which he is affiliated, or the publication, or any of the members of the publication or its parent organization. newswithchai.in is not responsible for the accuracy, completeness, suitability, or validity of any information on this article. All information is provided on an as-is basis. The information, facts or opinions appearing in the article do not reflect the views of newswithchai.in and newswithchai.in does not assume any responsibility or liability for the same.”

Image Credits: “Except where noted, the images in this article remain the exclusive property of newswithchai.in and unauthorized use of these images is expressly prohibited. If you wish to use an image from this editorial, please contact me via me@newswithchai.com for permission.