सिडकोचे वार्षिक स्नेहसंमेलन हे सिडकोतील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कला गुणांस वाव देणार व आपणा सर्वांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे,” असे उद्गार श्री. लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी सिडको स्नेहसंमेलन 2019 निमित्त कर्मचाऱ्यांना संबोधित करताना काढले. दि. 09 ऑगस्ट, 2019 रोजी सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे सिडको वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी सिडकोतील श्री. लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक; श्री. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक; श्री. निसार तांबोळी, मुख्य दक्षता अधिकारी; श्री. एस. के. चौटालिया, मुख्य अभियंता, नवी मुंबई; श्री. रमेश डेंगळे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार; श्री. आर. बी. धायटकर, मुख्य अभियंता (नमुंआंवि); श्री. प्रशांत भांगरे, व्यवस्थापक (कार्मिक); श्री. चंद्रशेखर बिवलकर, मुख्य लेखा अधिकारी; श्री. फैयाज खान, शहर सेवा- 1 व 3; श्री. निलेश तांडेल, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन; श्री. जे. टी. पाटील, सरचिटणीस, सिडको एम्प्लॉईज युनियन, श्री. विनोद पाटील, सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी युनियन आणि श्री. मिलिंद बागुल, अध्यक्ष, सिडको बी.सी.एम्प्लॉईज असोसिएशन यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“स्नेहसंमेलनासारखे सांस्कृतिक कार्यक्रम कर्मचाऱ्यांना येणारा ताण-तणाव दूर करण्यास सहाय्यभूत ठरतात. अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यातील कल्पकता व सृजनशीलतेला वाव देतात. यातून त्यांना एक प्रकारची उर्जा मिळते,” असे प्रतिपादन श्री. लोकेश चंद्र यांनी केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी सिडकोच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेत सिडकोतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमुळे सिडको सदैव यशोमार्गावरून वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त केला.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीमती प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको यांनी तर आभारप्रदर्शन श्री. ज्ञानेश्वर भोईर यांनी केले.प्रमुख कार्यक्रम पार पडल्यांनतर दुपारच्या सत्रात सिडको आर्टिस्ट कम्बाइन ग्रुपतर्फे सादर करण्यात आलेल्या गाण्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सायंकाळी ‘ईडियट्स’ या मराठी नाटकाचा प्रयोगही आयोजित करण्यात आला होता.