नागरिकांना योग्यरित्या महामार्ग ओलांडता यावा यासाठी शासनाने हायवेजवळ भुयारी पादचारी मार्गांची निर्मिती केली आहे. परंतु नवी मुंबई खारघर मधील ‘नागरिकांच्या सोइसाठी’ बांधलेले भुयारी मार्ग मात्र नागरिकांच्या डोकेदुखीचे कारण बनले आहेत. खारघर सेक्टर २ मधे असलेल्या सबवेमधे पाणी साठले असल्याने, हे भुयारी मार्ग डासांच्या निर्मितीचे मुख्य ठिकाण बनले असून नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील बरेचसे सबवे हे निरुपयोगी असून त्यांत पाणी साठल्याने या सबवेंमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच या सबवेच्या आराखड्यात अभियांत्रिकी त्रुटी असल्याने याचा वापर करणे अशक्य आहे. सबवेच्या एका बाजूकडील प्रवेश हा थेट नाल्यात असल्याने येथून जाणे अशक्य आहे. तसेच या सबवेमधे पाणी भरले असल्याने येथून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. याबाबत उपाययोजना तसेच माहिती मिळावी यासाठी कोंकण भवनमधील PWD चे मुख्य अभियंता व्ही. एस. देशपांडे यांची प्रतिक्रिया घेण्यास गेले असता त्यांनी हा विषय माझ्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून तुम्ही यासाठी मुंबई मधील कार्यालयात संपर्क साधावा असे सांगितले. त्यामुळे PWD चे ऑफिस असूनही फक्त विषय अखत्यारीत नसल्याने मुंबईला जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे सामान्य नागरिकांनी अशा लहान प्रश्नांसाठी मुंबईच्या फेऱ्या माराव्यात का हा प्रश्न पडतो !

पोलिसांना मोठा त्रास !

या सबवे लगतच पोलीस चौकी असल्याने येथील पोलीस कर्मचाऱ्यांना या डासांचा मोठा त्रास होत आहे पण तक्रार कोणाला करावी हा मोठा पेच त्यांच्या समोर आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया

या सबवेमधे मोठ्या प्रमाणात मच्छरांची उत्पत्ती होत असून डेंग्यू किंवा मलेरियाचे मच्छर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतांना देखील याकडे महानगरपालिका, सिडको किंवा PWD कोणीच लक्ष देत नाहीत, त्यामुळे कदाचित आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो.
– जयंत पाटील

मुख्य रहदारी जवळ असल्याने आमच्या रिक्षा हायवेच्या बाजूलाच आम्ही लावतो. परंतु बाजूलाच हा सबवे असल्याने येथील डासांचा मोठा अपव्यय आम्हाला होत असतो, या सबवेंमधे नेहमीच पाणी भरलेले असते तसेच बाजूलाच असलेल्या नाल्याचे गटारीचे पाणी देखील आत येत असते. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
– रिक्षा चालक

45750cookie-check1 min readसबवे बनतायेत डासांचे कारखाने !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here