downloadधडधाकट शरीर परमेश्वराने देऊन देखील निराश होऊन आईवडिलांच्या कष्टांचा, आपल्या मागे कुटंब नातेवाईक यांचा कोणताही विचार न करता जीवन संपवण्याचा यशस्वी अथवा अयशस्वी प्रयत्न करतात अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम आज या मुलांनी केले आहे. नियतीने निशिबी शारीरिक व्यंग आले, मात्र जिद्दीने त्यावर मात करीत बेलापूर सेक्टर 8 येथील ‘स्वामी ब्रहमानंद प्रतिष्ठान’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी अटकेपार झेंडा रोवला आहे. या विशेष मुलांच्या अविरत कष्टाची परिसीमा पाहता तोंडात बोट गेल्या शिवाय राहत नाही. स्वतःला  सावरणे कठीण जात असलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह संपूर्ण देशाचा नाव परदेशात जाऊन झळकावले आहे. या विशेष फुलांना देखील अधिकाधिक प्रोत्साहान देण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

अमेरिकेतील लॉस एंजल्स येथे पार पडलेल्या ऑलम्पिक  वर्ल्ड समर गेम्समध्ये पार पडलेल्या विविध स्पर्धांमधील स्विमिंग मध्ये स्नेह वर्मा (21) आणि दिशा मारू (26) या दोघींनी अप्रतिम कामगिरी पार पाडली आहे. अगदी विशेष मुले असून देखील परदेशात जाऊन हि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सीबीडी येथील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठानच्या शाळेत त्यांचा यशप्राप्ती सोहळा मोठ्या जालोशात पार पडला. या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी शाळेतील शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

अमेरिकेतील स्पेशल मुलांच्या स्पर्धेत स्नेहाने स्विमिंग बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक पटकावून भारताला बहुमान प्राप्त करून दिला आहे. तर 40 मीटर फ्री स्टाइल प्रकारात रौप्य पदक मिळवून साऱ्यांनाच अवाक केले आहे. दिशा गेली 23 वर्षे तर स्नेहा गेली 11 वर्षांपासून स्वामी ब्रम्हानंद शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. शाळेतील शिक्षक, पालक तसेच त्यांचे मार्गदर्शक यांनी त्यांच्यामागे विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे शाळेचे संस्थापक शिरीष पुजारी व प्राचार्या सुक्यन्या वेंकटरामन यांनी दोघींच्या या भव्य कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

खारघर येथे राहणाऱ्या स्नेहाने स्पेशल  ऑलिंपिक स्पर्धेत कोल्हापूर येथे 2013 मध्ये फ्री स्टाइल प्रकारात सिल्वर मेडल प्राप्त केले होते. याच वर्षी कर्नाटकातील मोंडा येथे फ्री स्टाइल व बॅक स्ट्रोक प्रकारत गोल्ड मेडल तर रिले मध्ये ब्रांझ पदक मिळवले होते.

तर पनवेल येथे राहणाऱ्या दिशा मारू हिने राष्ट्रीय स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेत कोल्हापूर येथे 2013 मध्ये फ्री स्टाइल प्रकारात ब्रांझ मेडल तर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सिल्वर मेडल प्राप्त केले होते. याच वर्षी कर्नाटकातील मोंडा येथे फ्री स्टाइल व ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात गोल्ड आणि रिले प्रकारात ब्राँझ मेडल मिळवले होते. तसेच ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या स्पेशल ऑलिंपिक आशिया पेसिफिक स्पर्धत रिले प्रकारात दोन ब्रांझ मेडल मिळवले होते.

Other Links: [1] http://swimindia.in/eight-differently-abled-indian-swimmers-to-participate-in-special-olympics-2015  [2] http://sbp-pushpa.blogspot.in/2015/04/disha-maru-and-sneha-verma-selected-to.html


Manoj DatkhileArticle Contributed By Manoj Ramchandra Datkhile: A graduate in economics and a journalist. He’s presently working as a reporter for ‘Sakal’, one of the leading Marathi daily Newspapers of India. When he’s not busy with writing and reporting, he enjoys teaching English! You can reach him on his mobile: 0.99674.69426 or email to [email protected]

Disclaimer: “The opinions expressed in this article are those of the author, and they do not reflect in any way those of the institutions to which he is affiliated, or the publication, or any of the members of the publication or its parent organization. newswithchai.in is not responsible for the accuracy, completeness, suitability, or validity of any information on this article. All information is provided on an as-is basis. The information, facts or opinions appearing in the article do not reflect the views of newswithchai.in and newswithchai.in does not assume any responsibility or liability for the same.”

Image Credits: “Except where noted, the images in this article remain the exclusive property of newswithchai.in and unauthorized use of these images is expressly prohibited. If you wish to use an image from this editorial, please contact team via [email protected] for permission.

28420cookie-check1 min readविशेष मुलांची असामान्य कामगिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here