ट्विटर, फेसबुक आणि युट्युब वर लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः २ जानेवारीला ‘लोकसंवाद’ साधून जाणून घेतली. या लोकसंवादाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, सोमवार दि. १४ जानेवारीला सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री आणि लाभार्थी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ‘लोकसंवाद’ होणार आहे. हा संवाद थेट लाईव्ह ट्विटर, फेसबुक आणि युट्युब पाहता येणार आहे.

हा लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या www.twitter.com/Dev_Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर,www.facebook.com/devendra.fadnavis या फेसबुक पेजवर आणि www.youtube.com/DevendraFadnavis या युट्यूब चॅनलसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. त्याशिवाय http://elearning.parthinfotech.in/ या लिंकवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, फळबागा, कांदा चाळ, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अन्न प्रक्रिया, शेडनेट, पॉली हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांबाबत सातत्याने आढावा घेतला आहे. मुख्यमंत्रांशी थेट संवाद साधता येत असल्याने या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून १४ तारखेला होणाऱ्या ‘लोकसंवादातून’ जास्तीत जास्त नागरिकांच्या अडी अडचणी मा. मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेतल्या जाणार आहेत.

42620cookie-check1 min readमुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी ‘लोकसंवाद’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here