बेलापूर मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीच्या
मंदा म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक गावडे, वंचित बहुजन आघाडी चे
पुरस्कृत अपक्ष उमेदवार गौतम गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गजानन काळे
यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या लढती मध्ये अनेक बलाढ्य पक्ष शर्यतीत असले
तरी वंचित बहुजन आघाडी चे पुरस्कृत अपक्ष उमेदवार गौतम गायकवाड यांचा प्रचार
आणि त्यांना मिळणारा पाठींबा पहाता या मतदारसंघाचे चित्र बदलणारे दिसत आहे.

गायकवाड हे उच्च शिक्षित व आंबेडकरांच्या विचारांशी  जोडला गेलेला असून व
सामाजिक भान असलेला व तळागाळातील समस्याशी संघर्ष करत आलेल्या गायकवाड
यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. बेलापूर मतदारसंघात प्रकाश
आंबेडकरना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच विविध समाजातील नागरीक तसेच
सामाजिक संघटना प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे वंचिताचे
बेलापूर मतदार संघात वाढत असलेली ताकतीकडे  दुर्लक्ष करता येणार नाही. बेलापूर
ते वाशी येथे पार पडलेल्या रॅली मध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते महिला,
पुरुष, तरुण वर्ग व अनेक गाड्याचा ताफा सामील झाला होता. “हमारा नेता कैसा हो
गौतम गायकवाड जैस.